अंबाला – हरियाणामध्ये एका धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ नेपाळी दिसत असल्याने दोन मुलींना पासपोर्ट देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणाची तक्रार हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांच्याकडे करण्यात आली आहे.
माहितीनुसार, हरियाणामधील संतोष आणि हिना या दोन बहिणींनी काही दिवसांपूर्वी चंदिगढस्थित क्षेत्रीय कार्यलयात पासपोर्टसाठी अर्ज करण्यास गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यांकडे पाहून अर्जावर ‘अर्जदार नेपाळी दिसत’ असल्याचे लिहिण्यात आले. यानंतर त्यांना राष्ट्रीयता सिद्ध करण्यास सांगितले. हा मुद्दा त्या बहिणींनी अनिल वीज यांच्याकडे उपस्थित केला. यानंतर अनिल वीज यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.