सुनील राऊत
पुणे : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत गतवर्षी देशात 37 व्या स्थानावर फेकल्या गेलेल्या पुणे महापालिकेकने अखेर पुन्हा या स्पर्धेत आपले अस्तित्व कायम ठेवत स्वच्छता लीगच्या दुसऱ्या टप्प्यात 12 व्या क्रमांकाचे स्थान टिकविले आहे. पाहिल्या लीग मध्येही पुणे महापालिका याच क्रमांकावर होती. तर तिसऱ्या लीगचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठीही पालिकेने जय्यत तयारी केली असून महापालिका या वर्षी पहिल्या दहा शहरात पुन्हा स्थान मिळविण्याची शक्यता आहे.
केंद्रशासनाने मागील वर्षापासून स्वच्छ सर्वेक्षणात बदल केला आहे. हे सर्वेक्षण वर्षातून एकदा न करता, प्रत्येक तीन महिन्यांनी केले जाणार आहे. त्यानुसार, पाहिले सर्वेक्षण लीग मार्च ते मे, दुसरे लीग जून ते ऑगस्ट या कालावधीत हे सर्वेक्षण झाले होते. त्यानुसार पाहिल्या दोन लीग मध्ये पुणे महापालिका देशात स्वच्छ शहरात 12 व्या क्रमांकावर आली आहे. तर या दोन लीग मध्ये पाहिल्या दहा शहरात नवी मुंबई आणि नाशिक शहराचा समावेश असून इंदोर या दोन्ही लीग मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.