लंडन : जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल स्थानी असलेला आणि ब्रिटनचा दिग्गज टेनिसपटू अँडी मरेने दुखापतीमुळे पुढील महिन्यात होणा-या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे.
३२ वर्षीय मरेला मागील महिन्यात ब्रिटनकडून डेव्हिस कप स्पर्धेमध्ये खेळताना घोट्याला दुखापत झाली होती. मरे याने यापूर्वी तीनवेळा ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले आहे.
We're sad to report that five-time finalist @andy_murray will not be playing in Australia in 2020 – can't wait to see you back here in 2021, Andy!
Read More: https://t.co/XewT5XNmJb #AusOpen pic.twitter.com/L64nmFuwW5
— #AusOpen (@AustralianOpen) December 28, 2019
याबाबत बोलताना तो म्हणाला, “यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्यासाठी नव्हे, तर जिंकण्यासाठी मी कसून मेहनत घेतली होती. मात्र घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे मी ही स्पर्धा आता खेळू शकणार नाही, हे वास्तव स्वीकारणे मला जड जाणार आहे.”