पाबळ: के बी पी इंटरनशनल स्कुल (थापेवाडी) पाबळ या प्रशालेचचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी दैनिक प्रभातचे श्रीकृष्ण पादीर सर,अडव्होकेट दीपक चौधरी,निवृत्त शिक्षक रसाळ सर,सरपंच पल्लवी डहाळे, माजी सरपंच रोहिणी जाधव,शारदा चौधरी,अर्जुन गायगवारे,प्रा.पी जी भालेराव,आणि आदित्य चॅरिटेबल ट्रस्ट पुणेचे अध्यक्ष डॉ.एन डी पिंगळे सर,सचिव शीतल टिळेकर,ग्रामस्थ फकिरा गव्हाणे,बलुतेदार क्रांती प्रतिष्ठानचे संजय शेम्बडे,सोमनाथ सुतार व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मानचिन्ह व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. याचे पालकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. तर मान्यवरांनी संस्थेच्या प्रगतीचा उल्लेख करून संस्था,कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यानंतर झालेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम तब्बल दोन तास रंगला, यात चिमुकल्यानी तब्बल 21 समूह नृत्य सादर करून पालकांची वाहवा मिळवली तर कर्मचारी वर्गाने अत्यन्त सफाईदारपणे संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करून दाखवला.