झारखंड : हेमंत सोरेन यांनी घेतली मुख्यमंत्री शपथ

शपथग्रहणाला शरद पवार, मुख्यामंत्री उद्धव ठाकरेंची दांडी 

रांची : झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) नेते हेमंत सोरेन यांनी झारखंडचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कॉंग्रेसचे दोन आमदार आणि राष्ट्रीय जनता दलाच्या एका आमदारांनीही यावेळी शपथ ग्रहण केली.

या कार्यक्रमात राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, कॉंग्रेस नेते आरपीएन सिंह, द्रमुकचे प्रमुख स्टालिन, एजेडी नेते तेजस्वी यादव, डावे नेते डी. राजा, सीताराम येचुरी, आपचे खासदार संजयसिंग, शरद यादव यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर ओरावण आणि कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आलमगीर आलम यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) एका आमदारानेही मंत्रीपदाची शपथ घेतली.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शपथ या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.

झामुमोने कॉंग्रेस पक्ष आणि लालू प्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)च्या सहकार्याने विधानसभा निवडणुका लढवल्या आणि 81 सदस्यांच्या सभागृहात सत्तेचाळीस जागांसह बहुमत मिळवले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत झामुमोने 30 जागा जिंकल्या आहेत, तर कॉंग्रेस आणि आरजेडीला अनुक्रमे 16  आणि एक जागा मिळाली आहे.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.