नवी दिल्ली : कझाकिस्तानमध्ये 100 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Plane with 100 people on board crashes in Kazakhstan, emergency services at the site – Almaty airport: Reuters pic.twitter.com/5F2q6jVD22
— ANI (@ANI) December 27, 2019
अल्माटी विमानतळावर टेक ऑफ घेताना जवळ असलेल्या दोन मजली इमारतीवर हे विमान आदळले. यावेळी विमानात 100 प्रवासी प्रवास करत होते. यापैकी काही प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. सध्या बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
Footage from the scene after Bek Air passenger plane carrying 100 people crashes into building in Almaty, Kazakhstan #Kazakhstan #kazakhstanplane #planecrash #planecrashes #plane #bekair #bekairplane pic.twitter.com/zTgH52gc4L
— Diego Lopes Tareszkiewicz (@DTareszkiewicz) December 27, 2019
टेक ऑफ दरम्यान या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अल्माटीवरून नूर सुल्तान या ठिकाणी जाताना हे विमान अपघातग्रस्त झालं. रॉयटर्सनुसार या विमानात एकूण ९५ प्रवासी आणि ५ क्रू मेंबर्स होते. स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी हा अपघात झाला.
टेक ऑफ दरम्यान विमानाचा ताबा सुटला आणि विमान नजिकच्या दोन मजली इमारतीवर जाऊन आदळल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आपात्कालिन सेवा विमानतळावर दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.