गया : चीन सरकार बंदुकीच्या ताकदीने आमच्याशी लढत आहे. मात्र तालीबानी बुध्द सत्याच्या बंदुकीने त्यांचा प्रतिकार करत आहेत, असे सांगत तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी चीनच्या साम्यवादी सरकारशी लढा सुरू ठेवण्याचे संकेत दिले.
बोध गया येथील महाबोधी मंदिरात दलाई लामा बोलत होते. या मंदिरातच भगवान गौतम बुध्द यांना दोन हजार वर्षापुर्वी दीव्यज्ञान झाल्याची श्रध्दा आहे. आपल्या श्रध्दावान अनुनयांच्या भेटीसाठी ते या पवित्र शहरात मंगळवारी रात्री आले. तेथे त्यांचा मुक्काम सुमारे पंधरा दिवस असेल.
तीन वर्षापुर्वी केलेल्या सर्वेक्षणात चीनमध्ये तिबेटी बुध्द समाजाच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ झाल्याचे तीन वर्षापुर्वी केलेल्या सर्वेक्षणातून सिध्द झाले होते. आमच्याकडे सत्याची ताकद आहे. तर साम्यवादी चीनकडे संहारक बंदुकांची ताकद आहे, असे लामा म्हणाले. लामा यांनी भारतात 1959पासून आश्रय घेतला आहे.