भोपाळ : दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर युवा नेमबाज अनिश भानवाला याने भोपाळ येथील राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत चार सुवर्णपदकांची कमाई केली.
अनीश भानवाला और @realmanubhaker ने राष्ट्रीय निशानेबाजी चैंपियनशिप में सीनियर व जूनियर वर्ग में जीता स्वर्ण पदक pic.twitter.com/DBtLpp4Pe0
— CMO Haryana (@cmohry) December 25, 2019
१७ वर्षीय अनिशने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये ज्युनियर, सिनियर वैयक्तिक , नॅशनल चॅम्पियनशीप इव्हेंट आणि सांघिक गटात असे एकूण चार सुवर्णपदके मिळवली. भोपाळमधील राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत २५० नेमबाजपटूनी सहभाग घेतला आहे. अनिशने सिनियर गटाच्या अंतिम फेरीत २८.८ तर ज्यूनियर गटाच्या अंतिम फेरीत स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम तोडत ३३ स्कोर करत विजय संपादित केला.
दरम्यान, अनिशने नेपाळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत देखील वैयक्तिक आणि सांघिकमध्ये दोन सुवर्णपदक पटकावले होते. वैयक्तिक प्रकारात अनिशने पाकिस्तानच्या बसीर खान मुस्तफा याचा पराभव केला होता.