कुपवाडा : पाकिस्तानने शनिवारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. कुपवाडा जिल्ह्यातील तंगधर आणि कांझलवण क्षेत्रांना पाकिस्तानी सैंन्याने लक्ष्य केले. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी कोणत्याही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
काश्मीरमधील आठमुकाम येथे स्थित पाकिस्तान लष्कराचे मुख्यालय आणि एसएसजी युनिट मुख्यालयाला भारतीय सैन्याने लक्ष केले. कारवाईत पाकिस्तानी सैनिकही मारले गेले आहेत.
लॉन्चिंग पॅडही उध्वस्त झाल्याची प्राथमिक महिती मिळते आहे.धुकेचा फायदा घेऊन पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरीचा करण्याचा प्रयत्न करत होते.