शेवगाव: शहरातील स्वामी समर्थ मंदीराशेजारील गजानन नगर परीसरातील प्राथमिक शिक्षिकेने खंडोबानगर परीसरात रहात असलेल्या वडीलांच्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. सुनंदा श्रीधर भागवत (वय-३३) राहणार एरंडगाव ता. शेवगाव असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबत ग्रामिण रुग्णालयाचे अधिक्षक यांच्या खबरीवरुन पोलीसांनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मयत सुनंदा या वरुर ता. शेवगाव येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत सह शिक्षिका होत्या. त्या खंडोबानगर परीसरात रहात असलेल्या वडील बाबासाहेब थोरात यांच्या घरी आज रविवार ता.१ रोजी दुपारी ३ च्या सुमारास गळफास घेतला. नातेवाईकांनी त्यांना ग्रामिण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असता डाँक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. रात्री उशीरा एरंडगाव येथे त्यांच्यावर अत्यंस्कार करण्यात आले. पुढील तपास पोलीस ना.बाबासाहेब शेळके हे करीत आहेत.
त्यांच्या मागे सासु – सासरे, पती, दोन मुले असा परीवार आहे. मयत सुनंदा यांचे वडील पाटबंधारे खात्यामधून नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत. एक भाऊ शिक्षक तर एक तहसिलदार आहे. मात्र एवढी सुशिक्षीत फँमिली असतांना त्यांनी कशामुळे नेमकी आत्महत्या केली हे कळू शकलेले नाही. त्यांच्या आत्महत्येमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.