मुंबई – पश्चिम बंगालमधील राणावत रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचा आवाजातील गाणे गाणारी रानू मंडलचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. रानू मंडलच्या या व्हिडीओने तिला एका रात्रीत सुपरस्टार बनविले.
रानू मंडल यांच्या ‘तेरी मेरी कहानी…’ या गाण्याने सामाजिक माध्यमांमध्ये चांगलीच पसंती मिळविली होती. मात्र सध्या त्यांच्यावर सामाजिक माध्यमांमधून ट्रोलिंग सुरु आहे. कधी उद्धट बोलण्यावरून तर कधी फॅन्सला दिलेल्या प्रतिसादवरून ट्रोल केले गेले तर आता तिच्या न्यू लुकमुळे चांगलेच ट्रोल केले जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो हा उत्तर प्रदेशमधील कानपुर येथील एका कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात त्यांनी डिझायनर ड्रेस परिधान केला असून त्या ड्रेसवर हेवी मेकअप केला असल्याचे पाहायला मिळाले. रानू यांना पाहून त्यांचा मेकअप नेमका कोणी केला आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता रानू यांचा मेकअप संध्या नावाच्या एका महिला मेकअप आर्टिस्टने केला असल्याचे म्हटले जात आहे. या मेकअप आर्टिस्टने रानू यांच्यासोबत रॅम्प वॉक देखील केला आहे.
Joker 2.0 is coming guys….Excitation level is damn high? pic.twitter.com/hktJsV8zOb
— Ahnied kolim (@kolim_official) November 17, 2019
तत्पूर्वी, सोशल माध्यमांवरील एका व्हिडिओनुसार पत्रकारांनी रानूची प्रशंसा करत, तिला प्रश्न विचारते. स्वप्न पूर्ण होतात. तुला इतके मोठे यश मिळाले, काय तुला विश्वास बसतो? असा प्रश्न रिपोर्टर रानूला करते. पण या प्रश्नाकडे पूर्णत: दुर्लक्ष करत रानू तिच्या बॅगेतून काहीतरी काढते आणि खाते. यानंतरही आपले जणू लक्षच नाही, अशा तो-यात ती रिपोर्टरकडे दुर्लक्ष करते. रिपोर्टर दुस-यांदा तिला प्रश्न विचारते. हा व्हिडीओ समोर येताच, रानूवर प्रचंड टीका होत आहे.