नवी दिल्ली : राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडक झाली. ही धडक एवढी तीव्र होती की यात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत.
Rajasthan: 10 people killed, 20-25 injured in collision between a bus and truck on National Highway 11 near Shri Dungargarh in Bikaner district pic.twitter.com/Pcfc42xdix
— ANI (@ANI) November 18, 2019
अपघातानंतर घटनास्थळी बस आणि ट्रक हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासगी बस आणि ट्रक यांच्यात ही धडक झाल्याची माहिती आहे. बसमधून 30 ते 35 प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यावेळीच हा अपघात झाला. घटनास्थळी आता मोठा पोलिस बंदोबस्त असून, वाहने हटवून मार्ग पुन्हा सुरू करण्याचे काम करण्यात येत आहे. 11 नोव्हेंबरला बिकानेर जिल्ह्यातच झालेल्या एका रस्ता अपघातात सात प्रवासी मृत्युमुखी पडले होते.