मुंबई : बॉलिवूडमधला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आमिर खान याचा ‘लाल सिंह चा’ मधला फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे. आमिरने आपल्या ट्विटमधून तो साकारत असलेल्या लाल सिंह चा या भूमिकेशी ओळख करून दिली आहे. 1 नोव्हेंबरपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. त्यातच आमिर खानचा ‘लाल सिंह चा’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे.
Sat Sri Akaal ji, myself Laal…Laal Singh Chaddha.? pic.twitter.com/aXI1PM8HIw
— Aamir Khan (@aamir_khan) November 18, 2019
1994 साली प्रदर्शित झालेल्या प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’चा हा अधिकृत रिमेक आहे. अभिनेता अतुल कुलकर्णी यानं चित्रपटाची कथा लिहिली आहे. आमिर ‘लाल सिंह चा’ ही शिख व्यक्तीरेखा साकारत आहे. या भूमिकेसाठी आमिरनं मेहनत घेतली असून तब्बल किलो वजनही त्यानं कमी आहे. आमिरसोबत करिना कपूरही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. 2020 मध्ये नाताळात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि आमिर खानही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार अशी चर्चा आहे.