मुंबई – बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मी आणि बिग बी अमिताभ बच्चन हे आगामी चेहरे चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि नवी रिलीझ डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट आता २४ एप्रिल २०२० ला प्रदर्शित होणार आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.
New release date… Amitabh Bachchan and Emraan Hashmi… #Chehre to release on 24 April 2020… Directed by Rumi Jafry… Produced by Anand Pandit Motion Pictures and Saraswati Entertainment P Ltd… Presenting the first look of the actors: pic.twitter.com/QHV2dboMpg
— taran adarsh (@taran_adarsh) November 8, 2019
हा चित्रपट एक थरारपट असून याची कथा एका मित्रांच्या ग्रुपवर आधारित असणार आहे, अस सांगण्यात येत आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी एका बड्या उद्योगपतीच्या व्यक्तिरेखेमध्ये दिसून येणार आहे, तर बिग बी अमिताभजी वकिलाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. या चित्रपटात रिया चक्रवर्ती, सिद्धांत कपूर, धृतमान चक्रवर्ती, रघुवीर यादव आणि अन्नू कपूर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.