टोकीओ : मायक्रोसॉफ्ट जपानमध्ये ऑगस्ट महिन्यात चार दिवसांचा आठवडा करण्यात आला होता. त्यामुळे 2018च्या ऑगस्टच्या तुलनेत उत्पादकता 40 टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास आले. आरोग्यपूर्ण कार्य आयुष्य या अभिनव योजने अंतर्गत या तंत्राज्ञानातील दिग्गज कंपनीने कामाचे तास कमी केले होते.
संपूर्ण ऑगस्ट महिन्यात तीन दिवसांचा विकेंड मिळावा म्हणून कंपनीने दोन हजार 300 कर्मचाऱ्यांना सुटी दिली होती. पण या काळात गेल्यावर्षीच्या याच महिन्यातील प्रतिकर्मचारी विक्रीत 39.9 टक्क्यांनी वाढ झाली. त्याव बरोबर मिटींग आणि इमेलला प्रत्यूत्तर पाठवण्याचे प्रमाण कमी करण्यात आले. यानुसार कोणतीही मिटींग 30 मिनिटांपेक्षा अीदक असू नये याची दक्षता घेण्यात आली. यातून कंपनीच्या वीज बिलात 23.1 टक्के कपात झाली. तर प्रिंटआऊटचे प्रमाण 56.7 टक्क्कयांनी कमी झाले.
स्वयं विकास आणि कुटूंबहित योजनेअंतर्गत हा प्रयोग केला. त्याला कर्मचाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सुमारे 92.1 टक्के कर्मचाऱ्यांनी चार दिवसांच्या कार्मिक आठवड्याची कल्पना स्तुत्य असल्याचे सांगितले. हिवाळ्यातही अशा स्वरूपाचा प्रयोग करण्याचा मानस असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. चार दिवसांच्या आठवड्यामुळे कांचे ओझे कमी होते. व त्याद्वारे तणाव कमी होतो, हेच यातूबन स्पष्ट झाले आहे.