मुंबई – जोधा अकबर, मोहेंजेदारो, या ऐतिहासिक चित्रपटांचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर लवकरच पानिपत चित्रपट घेऊन येत आहे. गोवारीकर हे ऐतिहासिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. पानिपतच्या लढाईवर आधारित पानिपत हा चित्रपट ते घेऊन येत आहेत. या चित्रपटात अभिनेता अर्जुन कपूर, संजय दत्त आणि अभिनेत्री क्रिती सॅनॉन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अहमद शाह अब्दालीची भूमिका संजय दत्तने साकारली आहे, त्याचा लूक सध्या व्हायरल होताना पहायला मिळतोय. अब्दालीच्या भूमिकेतील संजय दत्तचा फोटो आशुतोष गोवारीकर यांनी ट्विट केला आहे.
Sanjay Dutt… Character poster of Ashutosh Gowariker’s #Panipat… 6 Dec 2019 release… Trailer out tomorrow. pic.twitter.com/A1hdwfkkF2
— taran adarsh (@taran_adarsh) November 4, 2019
दरम्यान, या चित्रपटातील संजय दत्तचा लुक पहिल्यांदाच समोर आला आहे. तसेच उद्या म्हणजेच मंगळवारी या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज होणार आहे. पानिपतची लढाई ही मराठे हरले असले तरीही ती मराठ्यांची शौर्यगाथा होती. अहमद शाह अब्दाली याने ही लढाई जिंकली खरी पण चर्चा घडली ती मराठ्यांच्या साहसाची आणि पराक्रमाचीही. सदाशिवरावभाऊ या युद्धात कामी आला. हा सगळा इतिहास आशुतोष गोवारीकर मोठ्या पडद्यावर घेऊन येतो आहे.
Ahmad Shah Abdali – Death Strikes Where His Shadow Falls.
Panipat Trailer Out Tomorrow. #PanipatLook@duttsanjay @arjunk26 @kritisanon #SunitaGowariker @RohitShelatkar @avigowariker @ckmurali_dop @NITIN_DESAI @neeta_lulla @KolhapureP @Mohnish_Bahl #ZeenatAman pic.twitter.com/1iX8cKJAzs— Ashutosh Gowariker (@AshGowariker) November 4, 2019