मुंबई- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आपल्या फिटनेस मुळे सतत चर्चेत असतो. अक्षय नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून फिटनेस धडे देत असतो. नुकतंच अक्षयने आपल्या फेसबुक आकाउंटवरून मुलीसोबत मॉर्निंग वॉकला गेल्याचा फोटो शेअर केला असून, त्या खाली एक भावनिक कॅप्शन सुद्धा दिले आहे.
दरम्यान, या फोटो मध्ये अक्षय बरोबर एक गरीब कुटुंब देखील दिसून येत आहे. मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर अक्षयने एका गरीबाच्या घरात जाऊन प्यायला पाणी मागितल्यानंतरचा हा फोटो आहे. प्यायला पाणी मागितल्यानंतरचा हृदयस्पर्शी अनुभव सुद्धा अक्षयने सांगितला आहे. ‘आजचा मॉर्निंग वॉक हा माझ्या लहान मुलीसाठी एक धडा होता. आम्ही एका वृद्ध जोडप्याच्या घरी पिण्यासाठी पाणी मागण्यास गेलो आणि त्यांनी आम्हाला पाण्यासोबत खायलाही दिले. माझ्यासाठी हा हृदयस्पर्शी अनुभव होता’. असं अक्षयने म्हंटल आहे.
Today’s morning walk turned into a life lesson for the little one. We walked into this kind, old couple’s house for a sip of water and they made us the most delicious gur-roti. Truly, being kind costs nothing but means everything! pic.twitter.com/UOwm2ShwaX
— Akshay Kumar (@akshaykumar) October 31, 2019