पुणे-पनवेल-पुणे पॅसेंजर आणि पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस 31 ऑक्टोबरपर्यंत रद्द
पुणे – मंकी हिल ते कर्जत स्थानकादरम्यान सुरू असणाऱ्या तांत्रिक कामांमुळे पुणे ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या अनेक रेल्वे सलग तिसऱ्या आठवड्यात रद्द केल्या आहेत. ऐन दिवाळीमध्येच रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
पुणे-मुंबई-पुणे मार्गावरील पॅसेंजर आणि एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या गाड्या पुणे ते मुंबई मार्गावर धावणार नाहीत. तर पुणे-भुसावळ-पुणे एक्स्प्रेस दौंड, मनमाडमार्गे वळवण्यात येणार आहे. मुंबई-कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस, लोकमान्य टर्मिनस-हुबळी-लोकमान्य टर्मिनस एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, नांदेड-पनवेल-नांदेड एक्स्प्रेस आणि मुंबई-हैद्राबाद-मुंबई एक्स्प्रेस या गाड्या 31 ऑक्टोबरदरम्यान पुणे ते मुंबईदरम्यान रद्द केल्या असून पुणे स्थानकातून नियोजित वेळेत या गाड्या धावणार आहेत. तर लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरपर्यंत पुणे ते मुंबईदरम्यान रद्द होणार केले.