मुसळधार पावसामुळे सोलापुरात पाझर तलाव फुटला

सोलापूर – मुसळधार पावसामुळे लाडोळे गाव (ता.बार्शी) येथील सदानंद पाझर तलाव फुटल्याची माहिती मिळत आहे. यामुळे सुमारे १०० एकर शेतात पाणी घुसले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून नागझरी आणि भोगावती नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक वर्षांनंतर या नद्यांना पूर आला आहे.

दरम्यान, पुणे-अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होत असताना दुसरीकडे बंगालच्या उपसागरातही नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत मिळत आहे. या दोन्ही गोष्टी पूरक ठरल्याने राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.