हस्तांदोलन, सेल्फी, शुभेच्छांनी वाढला उत्साह
तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडेचे वातावरण शुक्रवारी काही निराळेच होते.., अभूतपूर्व गर्दीने सकाळपासूनच रस्ते ओसंडू लागले.., चौका चौकात समर्थकांनी रेखाटलेल्या आकर्षक रांगोळ्या लक्षवेधी ठरल्या…, फटाक्यांची जोरदार आतिषबाजी.., उमेदवारावर होणारा फुलांचा वर्षाव.., हलगीचा कडकडाट… अशा या उत्साही वातावरणात तळेगावकरांनी स्वागत केले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांचे. जागोजागी महिलांनी त्यांचे औंक्षण करीत त्यांना आशीर्वाद आणि सदिच्छा दिल्या, तर तरुण मुला-मुलींची त्यांच्यासोबत “सेल्फी’ घेण्यासाठी झुंबड उडाली.
कडोलकर कॉलनीतील सुनील शेळके यांच्या कार्यालयापासून सुरु झालेल्या या प्रचारफेरीत त्यांच्यासमवेत संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, तळेगावचे माजी नगराध्यक्ष व कॉंग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, मंगलताई भेगडे, वैशालीताई दाभाडे, यादवशेठ खळदे, माजी नगरसेवक अय्युब सिकीलकर, शिक्षण मंडळाचे सभापती ब्रिजेंद्र किल्लावाला, नगरसेवक संतोष भेगडे, शिवाजी आगवे, कृष्णराव भेगडे संस्थेचे अध्यक्ष संदेश जाधव, तळेगाव शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सुनीता काळोखे, माजी नगरसेवक सूर्यकांत काळोखे, अरुण पवार, तळेगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष संतोष खिल्लारे, मंगेश दाभाडे, माजी नगरसेवक दिलीपकाका खळदे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुकाराम नगर येथील गजानन महाराज मंदिरात सुनील शेळके यांनी दर्शन घेतले. पंचवटी कॉलनी, राव कॉलनी, मस्करणीस कॉलनी, काळोखेवाडी, श्री नगरी, लक्ष्मीबाग कॉलनी, ज्ञानेश्वरनगर, जिजामाता चौक, सुभाष चौक, शाळा चौक, चावडी चौक, डोळसनाथ मंदिर, कुंभारवाडा चौक, भेगडेआळी चौक, गणपती चौक, राजेंद्र चौक, तेली आळी चौक, मारुती मंदिर चौक आदी भागातून दिवसभरात प्रचारफेरी काढण्यात आली.
चौक-चौकात शेळके यांचे तळेगावकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना आशीर्वाद दिला. अण्णांनीही त्यांची आपुलकीने चौकशी केली. माता-भगिनींनीही त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली होती. लहान मुले देखील आपल्या आवडत्या सुनील अण्णांचे स्वागताला थांबलेली होती. आण्णाही या चिमुकल्यांसोबत “सेल्फी’ काढली.
मतदारांच्या गाठीभेटी घेत निघालेल्या सुनील शेळके हे सर्वांचीच आस्थेने चौकशी करीत होते. मावळ तालुक्याच्या विकासासाठी मला तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुम्ही मला सहकार्य करा, मी तालुक्याचा कायापालट करतो, असे ते म्हणाले. मतदारांनीही यावर आमची मते तुम्हालाच, असा प्रतिसाद शेळके यांना दिला.