धैर्यशीलदादांना नरेंद्र मोदींचे आशीर्वाद

कराड – शिवसेनेची वाढलेली ताकद, भाजपने बुथ स्तरापर्यंतचे विणलेले कार्यकर्त्यांचे जाळे, कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे भक्कम पाठबळ, कराड-सातारा-कोरेगाव-खटाव तालुक्‍यातून मिळालेली रसद, स्वत:चे कार्यकर्त्यांचे मोहोळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशिर्वादरुपी डोक्‍यावर ठेवलेला हात यामुळे शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयतक्रांती- शिवसंग्राम महायुतीचे कराड उत्तरमधील उमेदवार धैर्यशील कदम यांचा विजय निश्‍चित असल्याचा विश्वास जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते भीमरावदादा पाटील व जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी व्यक्त केला.

कराड उत्तर विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी शुक्रवारी झंझावाती प्रचारदौरा करत विविध गावांना भेटी दिल्या. त्यावेळी ग्रामस्थांशी चर्चा करताना ते बोलत होते. ते म्हणाले, धैर्यशील कदम यांना विविध भागातून मिळालेला पाठिंबा व समर्थन लक्षात घेता शिवसेनेची राष्ट्रवादीबरोबर थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. धैर्यशील कदम यांना प्रचंड मताधिक्‍क्‍याने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.