गतवर्षी प्रदर्शित झालेल्या “धडक’ चित्रपटात ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर एकत्रित झळकले होते. या जोडीला प्रेक्षकांनी खुपच पसंती दर्शविली होती. या चित्रपटानंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याचीही चर्चा रंगली होती. अनेक कार्यक्रमांमध्येही त्यांना एकत्रितपणे स्पॉट करण्यात आले होते. या दोघांमधील संबंध अद्यापही कायम असल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वीच या दोघांना झोया अख्तर यांच्या घराबाहेर पाहण्यात आले होते. हे दोघेजण झोयाने आयोजित केलेल्या पार्टी सहभागी होण्यासाठी आले होते. या पार्टीनंतर ईशान आणि जान्हवीचे फोटो समोर आले आहेत. या फोटोत ईशान टीशर्ट आणि ब्लॅक पॅटमध्ये कूल दिसत आहे, तर जान्हवी फ्लोरल प्रिंटच्य ग्रीन आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसते.
दरम्यान, वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास ईशान सध्या अनन्या पांडेसोबत “खाली पीली’ चित्रपटात व्यस्त आहे, तर जान्हवी आपल्या आगामी “कारगिल गर्ल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. याशिवाय जान्हवी “रूही अफजा’, “तख्त’ आणि “दोस्ताना’2′ चित्रपटात काम करत आहे.