फराह खानच्या आगामी चित्रपटात हृतिक-अनुष्काची जोडी

बॉलीवूडमधील फराह खान याच्या आगामी चित्रपटात ह्रतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनुष्का शर्मा यांना घेणार असल्याची चर्चा गेल्या काही काळात होती. त्यावेळी कास्टिंगबाबत काहीही निश्‍चित नव्हते. पण आता फराहने आपल्या चित्रपटासाठी हृतिक आणि अनुष्काला साईन केले आहे.

विशेष म्हणजे, या चित्रपटाशी रोहित शेट्‌टीचेही नाव जोडण्यात आले आहे. जे सतत ब्लॉकबस्टर चित्रपट देण्यासाठी ओळखले जातात. या चित्रपटाचे दिग्दशर्न फराह, तर रोहित शेट्‌टी प्रड्यूस करणार आहे. मात्र, याबाबत अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. पण असे म्हटले जात आहे की, 1982मध्ये प्रदर्शित झालेल्या “सत्ते पे सत्ता’ या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक असेल.

दरम्यान, हृतिक आणि अनुष्काबाबत सांगायचे झाल्यास, हृतिकचा नुकताच प्रदर्शित झालेला “वॉर’ चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर धमाल करत आहे. दुसरीकडे अनुष्का गतवर्षी प्रदर्शित झालेल्या “झिरो’ चित्रपटात झळकली होती. यात तिच्याशिवाय कतरिना कैफ आणि शाहरुख खानने प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर अनुष्काने एकही चित्रपट साईन केलेला नाही. जर अनुष्काने फराहच्या चित्रपटासाठी होकार दर्शविल्यास एका वर्षानंतर ती बिग स्क्रीनवर झळकेल.

Leave A Reply

Your email address will not be published.