कोंढवा – गेल्या अनेक वर्षांपासून लुल्लानगर चौक येथे वाहतुकीची जीवघेणी समस्या भेडसावत असल्याने नागरिक हैराण होते. याची तत्काळ दखल घेत आमदार योगेश टिळेकर यांनी केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना लुल्लानगर चौक येथे आणून येथील वाहतूक कोंडीची वास्तव परिस्थिती दाखवून दिली. त्यानंतर संरक्षण खात्याने पूल उभारण्यासाठी सर्व परवानग्या दिल्या.
पाठपुुरावा करून उड्डाणपूल पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला केल्यामुळे वाहतुकीची समस्या कायमची सुटल्याने कोंढवावासियांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोंढवा खुर्द व परिसरातील सर्व नागरीक व शिवसैनिक आमदार टिळेकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही शिवसेना हडपसर विधानसभा मतदारसंघ प्रमुख तानाजी लोणकर यांनी दिली आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे उमेदवार भाजप युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश (अण्णा) टिळेकर यांच्या प्रचारार्थ कोंढवा खुर्द, शिवनेरीनगर, मिठानगर, भाग्योदयनगर आदी भागांत पदयात्रा व मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. त्याप्रसंगी लोणकर बोलत होते. पदयात्रेस शिवसैनिकांसह नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत महायुतीच्या पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे, शिवसेना हडपसरप्रमुख तानाजी लोणकर, नगरसेवक नाना भानगिरे, दादासाहेब लोणकर, अल्पसंख्याक मोर्चा सरचिटणीस इसाकभाई पानसरे, उद्योगपती भाऊसाहेब पारगे, प्रशांत लोणकर, राजेंद्र बाबर, सचिन ननावरे, सोमनाथ हारपुडे, मारुती ननावरे, सज्जन कवडे, प्रवीण जगताप, महेंद्र गव्हाणे, अमर गव्हाणे, नगरसेवक विरसेन जगताप, नवनाथ लोणकर, मदन शिंदे, प्रतीक लोणकर, चाचा शेख, सत्पाल पारगे, चिंतामण जगताप, अमर पवळे, मुसा इनामदार, निजामभाई शेख, अजिम काझी, शाहिद इमानदार, मैनु शेख
उपस्थित होते.