पुणे : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 5 टक्के वाढ करण्याची घोषणा करून दिवाळी भेट दिली आहे. मंत्रिमंडळाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. यापूर्वी त्यांना 12 टक्ते महागाई भत्ता मिळत होता. दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 60 लाख निवृत्तांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे सरकारवर 16 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.