धम्मचक्र परिवर्तन दिनाची ६वी धम्मपहाट जल्लोषात पार पडली..

येरवडा (प्रतिनिधी) – धम्म चक्र प्रवर्तनदिनानिमित्त समाज प्रबोधन ग्रुपच्यावतीने धम्म पहाट गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात व शिरीष पवार, प्रविण डोणे तसेच सुर्यकांत घोगरे यांनी प्रबोधन गीते सादर केली.

या कार्यक्रमात गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज , डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ,जिजाऊ माता रमाई,सावित्री माई फुले ,या सर्व महापुरुषांवर प्रबोधनात्मक गीते सादर करण्यात आली. बुद्धांनी सांगितलेल्या समता व एकते चा संदेश धम्मपहाट च्या माध्यामातुन देण्यात आला. पहाटे ५-३० वाजल्या पासुन अनेक अनुयायी या धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यात सामिल झाले होते.

सामुहीक बुद्ध वंदना घेवून प्रसिद्ध गायिका कडुमाई खरात यांनी “तुम्ही खाता त्या भाकरी वर बाबासाहेबांची सही हाय रं” तसेच त्या राजधानी वरती भगवं निशान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. या गाण्यांनी सर्वांची मने जिंकली .
जाती पाती च्या पलीकडे जाऊन सर्व जातीचे धर्माचे लोक या सोहाळ्यात सामिल झाले होते .

यावेळी पुणे मनपा चे अधिकारी यांच्या समवेत प्लास्टिक बंदी साठी पर्यावरण सांभाळणारी शप्पथ घेण्यात आली.अवेरनेस साठी , तसेच शैक्षनिक प्रेरणा मिळावी सासाठी ग्रुप च्या सर्व वकीलांचा सत्कार संविधान प्रत देऊन घेण्यात आला.

ऍड. दिपक गायकवाड, ऍड. महेश मोरे, ऍड. वैभव खरात, ऍड. किशोर भोरे, ऍड. निलम चव्हाण, ऍड.रेखा मोहाडीकर या वकीलांचा सत्कार केला व झोपडपट्टीत राहुन एम पि एस सि परीक्षेत उत्तिर्ण होउन अधिकारी म्हणुन नुकत्याच नेमणुक झालेल्या ऐश्वर्या बुचुटे यांचाही सत्कार घेण्यात आला.

तसेच सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर राठोड, सुदेश रासकर, राजाभाऊ आल्हाट, अविनाश गायकवाड, अभिजीत कदम यांचा सत्कार ही घेण्यात आला. यावेळी डॉ. सिद्धार्थ धेँडे उपआयुक्त मोळक,प्रा.दळवी देखील उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व ग्रुप ची माहीती बाळासाहेब म्हस्के, कश्यप ठमके, संदीप घोगरे, सायबू चव्हाण यांनी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here