सोलापूर: माळशिरस विधानसभा मतदार संघात राम सातपुते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजप-सेना-रिपाई युतीचे उमेदवार म्हणून सातपुते यांच्या नावाची घोषणा जयसिंह-मोहिते पाटील यांनी केली.
यावेळी राम सातपुते म्हणाले, “माझ्या आई-वडिलांनी अकलूजच्या सहकारमहर्षी साखर कारखान्यात ऊसतोड मजूर म्हणून काम केले आहे. माळशिरस तालुक्याच्या मिठावर माझे शिक्षण पूर्ण झाले आहे. तालुक्याशी मी कधीही गद्दारी करणार नाही”
मागील दोन टर्म माळशिरस मतदारसंघातून आमदारकी जिंकणारे दिवंगत आमदार हनुमंतराव डोळस यांचे निधन झाल्याने त्याजागी आता मोहिते पाटील कोणाला उमेदवारी देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.