निवडणूक निर्णय अधिकारी तेली यांची माहिती
राजगुरूनगर – खेड-आळंदी विधानसभा मतदार संघात आज (मंगळवार) दोन उमेदवारांनी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज भरले असून अतापर्यंत तीन उमेदवारांनी 6 उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय तेली यांनी दिली.
खेड-आळंदी (197) विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने दोन उमेदवारी अर्ज भरले तर त्यांच्या समवेत आलेले खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर यांनी राष्ट्रवादीकडून एक व एक अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले.
बाजार समिती ते राजगुरूनगर बाजार पेठमधून खेड तहसीलदार कार्यालयापर्यंत बैलगाडीतून रॅली काढली होती. यावेळी तालुक्यातील जनसमुदाय सहभागी झाला होता. दिलीप मोहिते पाटील यांच्यासोबतच रामदास ठाकूर हेही बैलगाडीत विराजमान होते, त्या दोघांनी बरोबर जाऊन उमेदवारी अर्ज भरले आहेत.
जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख हे गुरुवारी (दि. 3) उमेदवारी अर्ज भरणार असून मोठे शक्तीप्रदर्शन करणार आहेत, तर विद्यमान आमदार सुरेश गोरे यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली असून एबी फॉर्म मिळाला असल्याने ते शुक्रवारी (दि. 4) दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तिकीट नक्ती कोणाला मिळणार याची उत्कंठा अजूनही आहे.