मुंबई – राज्याचे जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या भरधाव गाडीने एका तरुणाला चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये त्या तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. श्याम होळे असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने सावंत यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. दरम्यान, घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी-लातूर बायपास रस्त्यावरील बीआयटी महाविद्यालयाजवळ हा अपघात झाला. सकाळी नऊ वाजता तानाजी सावंत यांच्या भरधाव गाडीने श्यामला जबर धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. आणि उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त जमावाने सावंत यांच्या गाडीची तोडफोड केली. मृत श्याम होळे हा व्यवसायाने भाजी व्रिक्रेता होता.
दरम्यान, तानाजी सावंत सध्या मुंबईत असून गाडीत त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.