बंगळूरू : येथील नागरिकांना काही दिवसांपुर्वी रात्रीच्या वेळी आश्चर्याचा धक्का बसला कारणही तसेच होते. अर्थात बंगळूरूच्या यशवंतपूरामध्ये चक्क एक अंतराळवीर रस्त्यावर चालताना दिसला होता. त्याचाच एक व्हिडीओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. शहरातील रस्त्यांची खड्यांमुळे दुरावस्था झाली आहे. याच खड्यात हा अंतराळवीर चालत आहे परंतू, व्हिडीओमध्ये तो चंद्रावरील खड्यांमध्ये चालत असल्यासारखे वाटत आहे.
Hello bbmp? @BBMPCOMM @BBMP_MAYOR @bbm #thelatest #streetart #nammabengaluru #herohalli pic.twitter.com/hsizngTpRH
— baadal nanjundaswamy (@baadalvirus) September 2, 2019
प्रसिद्ध कलाकार बादल नानजुंदास्वामी यांनी हा व्हिडीओ तयार केला आहे. प्रशासनाचे खराब झालेल्या रस्त्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी हा व्हिडीओ तयार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. नानजुंदास्वामी व्हिडीओत असे चालत आहेत जेणेकरूण व्हिडीओ पाहणाऱ्या लोकांना दिसणारे खड्डे हे चंद्रावरचे असल्याचे वाटतील. त्यासाठीच त्यांनी अंतराळवीराची कल्पना असणारा व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ तयार करण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध कलाकार पुरनचंद यांची मदत घेतली.