मुंबई: माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. माजी अर्थमंत्री आणि स्वतःच्या उत्तम संवादशैलीने संसदेतील चर्चांमध्ये जिवंतपणा आणणारे श्री. अरुण जेटली ह्यांचं निधन झालं. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन असे राज यांनी केलेल्या ट्विटर संदेशात नमूद करण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री आणि स्वतःच्या उत्तम संवादशैलीने संसदेतील चर्चांमध्ये जिवंतपणा आणणारे श्री. अरुण जेटली ह्यांचं निधन झालं. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. #ArunJaitley
— Raj Thackeray (@RajThackeray) August 24, 2019