राज ठाकरेंच्या स्टाईलमध्ये प्रसादने मारला ‘ईडी’ला टोमणा

मुंबई- कोहिनूर मिल प्रकरणी गुरुवारी मनसे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ यांची ईडी कार्यालयात साडेआठ तास चौकशी करण्यात आली. राज ठाकरेंना मिळालेल्या ईडीच्या नोटीसनंतर त्यांच्यावर सूडबुद्धीनं कारवाई होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला होता.

दरम्यान, या घटनेवर मराठी अभिनेता प्रसाद ओकने देखील आपल्या इन्स्ट्राग्रामवर त्याचा स्वत:चा राज ठाकरे यांच्या अंदाजातील फोटो शेअर केला असून, त्याला ‘Thinking About EDitos’ असं कॅप्शन दिले आहे. त्यामुळे ईडीकडून झालेल्या चौकशीला प्रसादने चांगलाच टोमणा मारला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, अभिनेता अमेय वाघ यांसारख्या कलाकारांनी देखील या पोस्टला लाइक केलं आहे.

 

View this post on Instagram

 

Thinking about EDiots…😜

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात सकाळी साडेअकराच्या सुमारास दाखल झाले होते आणि रात्री सव्वाआठच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले. त्यांची दुपारी 12 वाजेपासून चौकशी सुरु करण्यात आली होती. ती रात्री सव्वा आठच्या सुमारास पूर्ण झाली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)