नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम हे काल रात्री सीबीआय मुख्यालयाच्या गेस्ट हाऊसमध्ये होते. बुधवारी संध्याकाळी सीबीआयने त्यांना त्यांच्या घरातून अटक केली. अटकेनंतर त्यांना सीबीआय मुख्यालयात आणण्यात आले, रात्री त्यांना गेस्ट हाऊसच्या ‘स्वीट -3’ मध्ये ठेवण्यात आले.
२०११ मध्ये चिदंबरम गृहमंत्री असताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासमवेत या मुख्यालयाच्या उद्घाटनास पोहोचले होते. ते या कार्यक्रमास खास पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी मनमोहन सिंग यांच्यासमवेत संपूर्ण इमारतीचा पाहणी केली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी त्यांची चौकशी केली गेली. ही चौकशी सुमारे तीन तास चालली. सीबीआय त्यांना सुमारे ४ वाजता न्यायालयात हजर करेल.
आयएनएक्स मीडियाशी संबंधित प्रकरणातील नाट्यमय घटनेनंतर सीबीआयने बुधवारी रात्री पी चिदंबरम यांना त्यांच्या निवासस्थानी अटक केली. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास चिदंबरम यांना सीबीआयच्या मुख्यालयात आणण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्यासमवेत तपास पथकाचे अनेक सदस्य उपस्थित होते.