पिंपळगाव जोगा – जुन्नर येथील धरण परिसरात अनेक फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झालेले आहे. माळशेज घाटात वर्षा पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी ही जणू पर्वणीच आहे. येथून जवळच पाठीमागे किल्ले सिंदोळा इतिहासप्रेमींना साद घालतो आहे. हे छायाचित्र टिपले आहे, प्रभातचे वाचक वनरक्षक रमेश खरमाळे यांनी.