कामगारनगरीत प्रबोधनात्मक उपक्रम ः पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात
पिंपरी – भारताचा 73 वा स्वातंत्र्य दिन पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. पूरग्रस्तांना या माध्यमातून मदतीचा हात देत अन्य प्रबोधनात्मक कार्यक्रम देखील राबविण्यात आले. महापालिका, पोलीस आयुक्तालयासह शाळा, महाविद्यालयांमधून ध्वजारोहण करण्यात आले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर राहुल जाधव यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, शिक्षण समिती सभापती मनिषा पवार, नगरसेवक राजू मिसाळ आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे ध्वजारोहण
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे खराळवाडी येथील कार्यालयात शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी यावेळी महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, पक्ष प्रवक्ते फजल शेख, नगरसेविका अपर्णा डोके, गीता मंचरकर, ओबीसी अध्यक्ष विजय लोखंडे, सेवादल अध्यक्ष आनंदा यादव, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, व्यापारी सेल अध्यक्ष प्रदीप गायकवाड, वकिल सेल अध्यक्ष गोरक्ष लोखंडे आदी उपस्थित होते.
“मॉडर्न’मध्ये “कारगिल’च्या आठवणींना उजाळा
निगडीतील येथील यमुनानगर येथील मॉडर्न महाविद्यालयात निवृत्त मेजर प्रतापसिंह भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. प्रवीण चौधरी, निवृत्त सुभेदार भागवत शिंदे, अमिता किराड, मुख्याध्यापक सतीश गवळी, राजीव कुटे, संगीता घुले, तृप्ती वंजारे, गौरी सावंत, पांडुरंग मराडे, सदाशिव शिरगावे, रेखा धामणे आदी उपस्थित होते. यावेळी मेजर प्रतापसिंह भोसले यांनी कारगिल युद्धाचे अनेक प्रसंग सांगून जवानांच्या त्यागाची आणि पराक्रमाची माहिती दिली.
कॉस्मोपॉलिटन एज्युकेशनतर्फे स्वातंत्र्यवीरांना मानवंदना
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सचिव लतीफ मगदूम, डॉ. अरिफ मेमन, शाहिद इनामदार, एस. ए. इनामदार, हाजी कादीर कुरेशी आदी उपस्थित होते. लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी वर आधारित तसेच स्वातंत्र्यवीरांच्या कार्याला मानवंदना देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.
“वंडरलॅंड’मध्ये देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण
ओम प्रतिष्ठान संचलित वंडरलॅंड स्कूलमध्ये डॉ. सलील पाटील यांनी स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन दिल. डॉ. पराग पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले. यावेळी चिमुकल्यांनी देशभक्तीवर गीत साजरे करून सर्वांची मने जिंकली. मुलांनी गांधीजी, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, भगतसिंग, भारतमाता अशा अनेक वेशभूषेत येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. रवींद्र काळे यांनी घोषणा देऊन वातावरण देशभक्तीपर केले. वनिता सावंत यांनी आभार मानले.
शिवतेजनगरमध्ये विविध संस्थांची प्रभात फेरी
शिवतेजनगर येथील तिरंगा चौकात महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिवतेज प्रतिष्ठान, राजे शिवबा युवा मंच, विठ्ठल रुख्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट, शिवतेज मित्र मंडळ आदी संस्थांनी परिसरात प्रभात फेरी काढली. सर्व वयोगटातील नागरिक स्त्री पुरुष आणि मुले हातात तिरंगी झेंडे घेऊन फेरी मध्ये सहभागी झाले होते.
तिरंगी झेंड्याला मानवंदना देण्यात आली. व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी “भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता’ या विषयावर उपास्थितांना मार्गदर्शन केले. पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका योगिता नागरगोजे, संदीपान मंगवडे, अनिल नेवाळे, बालाजी कानवटे, राजेंद्र कुलकर्णी, चंद्रकांत बावळे, नामदेव निकम, विठ्ठल दळवे, सागर गावडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाटील यांनी केले.