सविंदणे – शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत टाकळी हाजी औटपोस्टचे पोलीस उपनिरीक्षक भगवान जगन्नाथ पालवे यांना गडचिरोलीमध्ये विशेष व खडतर सेवा केल्याबद्दल विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.
ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले. 2014 ते 2017 या कालावधीत नक्षलग्रस्त विभागात केलेल्या सेवेतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल पालवे यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले होते. पालवे यांनी टाकळी हाजी औटपोस्टची सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूधंद्यावर धडक कारवाई करीत कंबरडे मोडले आहे.