मुंबई – आज स्वातंत्र्यदिनी नेटफ्लिक्सवर बहुप्रतिक्षित वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’चं दुसरं पर्व प्रदर्शित करण्यात आलं आहे. या वेब सीरिजच्या निमित्ताने गणेश गायतोंडे आणि गुन्हेगारी विश्वाची एक नवी बाजू प्रेक्षकांना पाहता आली. सध्या सेक्रेड गेम्स 2 ला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या पर्वामध्ये अनेक मराठमोळ्या कलाकारांची वर्णी लागली आहे. अभिनेत्री अमृता सुभाष हीसुद्धा या सीरिजमध्ये दमदार भूमिकेत दिसत आहे. अमृतासोबतच या सिरीज मध्ये अभिनेता अमेय वाघ देखील दिसून येत आहे. खुद्द अमेयनेच अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत एक फोटो पोस्ट करत ही बाब उघड केली.