नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. नवी दिल्लीत 29 ऑक्टोबरपासून परिवहन निगम (डीटीसी) आणि क्लस्टर बसमधून महिलांना मोफत प्रवास करता येणार असल्याचे केजरीवाल यांनी आज सांगितले आहे. दिल्लीत महिलांना असुरक्षित वाटते. महिलांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
ये क़दम महिलाओं के सम्मान, सुरक्षा, सशक्तिकरण एवं उनके सपने साकार करने की दिशा में बेहद महत्वपूर्ण साबित होगा। https://t.co/iA1qZDkO7h
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 15, 2019
दरम्यान, दिल्लीतील सक्षम महिला त्यांना वाटल्यास तिकिट काढू शकतात. महिलांच्या मोफत प्रवासामुळे डीएमआरसीचे होणारे नुकसान दिल्ली सरकार भरून काढणार असल्याचे देखील अरविंद केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.