पुणे –पुणे व पिंपरी-चिचंवड महापालिका हद्दीत अकरावी प्रवेशासाठी विशेष फेरीची गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. महाविद्यालयांचा या फेरीचा कट ऑफ घसरला आहे. या फेरीद्वारे 14 हजार 866 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. अकरावी प्रवेशासाठी 296 कनिष्ठ महाविद्यालयात 1 लाख 4 हजार 139 जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या. विशेष फेरीअंतर्गत प्रवेशासाठी 20 हजार 2 अर्ज उपलब्ध झाले होते.
यातील कला शाखेच्या 1 हजार 709, वाणिज्यशाखेच्या 6 हजार 682, विज्ञानसाठी 5 हजार 921, एचएसव्हीसीसाठी 554 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. पहिल्या पसंतीक्रमानुसार 7 हजार 694, दुसऱ्या पसंतीक्रमाने 2 हजार 794, तिसऱ्या क्रमाने 1 हजार 499, चौथ्या पसंतीक्रमाने 958, पाचव्या क्रमाने 678, सहाव्या क्रमाने 479, सातव्या क्रमाने 300, आठव्या क्रमाने 217, नवव्या क्रमाने 133, दहाव्या पसंतीक्रमाने 114 या प्रमाणे विद्यार्थ्यांना आता प्रवेश मिळणार आहे.
एसएससी बोर्डाच्या सर्वाधिक 13 हजार 386 विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. सीबीएसईच्या 998, आयसीएसईच्या 313, आयबीच्या 7, आयजीसीएसईच्या 9,एनआयओएसच्या 85 विद्यार्थ्यांनाही प्रवेश जाहीर झाला आहे. विशेष फेरीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनी 16 व 19 ऑगस्ट रोजी प्रवेश घ्यावा लागणार आहे.