आज श्रीदेवीचा जन्मदिन आहे. यानिमित्ताने बॉलिवूड आणि कपूर खानदानातून तिची आठवण काढली जात आहे. श्रीदेवीला आदरांजली वाहण्यासाठी सिंगापूरच्या मादाम तुसॉं म्युझियममध्ये तिचा वॅक्स स्टॅच्यु उभारण्यात येणार आहे. या पुतळ्यासाठी म्युझियममधील वॅक्स आर्टिस्टच्या 20 कारागिरांची टीम गेल्या 5 महिन्यांपासून काम करते आहे.
“मिस्टर इंडिया’तील “हवा हवाई’च्या पोझमधील श्रीदेवीला साकार करण्यासाठी तिचे एक्सप्रेशन, मेकअप आणि आउटफिट रिक्रिेट करणे खूप आव्हानात्मक होते. श्रीदेवीचा मुकुट, ड्रेस, इअररिंग्ज आणि ड्रेससाठी 3 डी प्रिंटींगच्या माध्यमातून टेस्ट केले गेले. या पुतळ्याच्या उभारणीच्या कामाला सप्टेंबर महिन्यात सुरूवात झाली होती.
बोनी कपूर, जान्हवी आणि खुशी यांच्या उपस्थितीत या कामाला प्रारंभ झाला होता. श्रीदेवी भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधील आयकॉन होती. तिच्या पुतळ्याशिवाय सिंगापूर मादाम तुसॉं म्युझियम अपूर्ण आहे, असे या म्युझियमच्या जनरल मॅनेजरने सांगितले. “मिस्टर इंडिया’चा सिक्वेल करायचे काही दिवसांपूर्वी ठरत होते.
मात्र श्रीदेवीच्या अनुपस्थितीमुळे या सिनेमाचे भविष्य अधांतरी झाले होते. आता कदाचित त्या सिक्वेलची पुन्हा जुळवाजुळव व्हायला लागेल. त्यासाठी बोनी कपूरचा पाठपुरावा आवश्यक असणार आहे.