पुणे -सांगली शहरातील पूरग्रस्तभागाच्या स्वच्छतेसाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पथक रविवारी सकाळी सांगलीकडे रवाना करण्यात आले. या पथकात 85 कर्मचारी असून यामध्ये 1 विभागीय आरोग्य निरीक्षक, 5 आरोग्य निरीक्षक, 3 मोकादम, 1 जेटिंग मशीन ऑपरेटर, या मनुष्यबळ व 2 मोठ्या बसेस, 1 युटिलिटी वाहन, 1 जेटिंग मशीन वाहन, 50 खराटे, 5 दातरे, मोठे बांबूझाडू, मास्क, हातमोजे असे साहित्य देण्यात आले आहे.
गुलटेकडी वाहन विभागानजिकच्या घनकचरा आरोग्य कोठी येथे पथकाला उपायुक्त माधव जगताप, माहिती व जनसंपर्क अधिकारी संजय मोरे यांनी मार्गदर्शन केले. त्यात प्रामुख्याने पूरग्रस्त भागातील संपर्क यंत्रणा, कामाचे नियोजन, नागरी सहकार्य अशा विविध विषयांबाबतीत मार्गदर्शन करण्यात आले,
तर या पथकाची माहिती सांगली महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र तेली आणि धनंजय हर्षद यांना देण्यात आली आहे. या शिवाय सांगलीसह कोल्हापूर पूरग्रस्त भागासही स्वतंत्र 4 वाहने पाठविण्यात आले असल्याचे वाहन विभागाचे अभियंता राजेंद्र शिपेकर यांनी यावेळी सांगितले.