तळेगाव ढमढेरे – येथील वेळ नदीवरील भैरवनाथनगर बंधाऱ्यावरील संरक्षण कठडे तुटले असल्याची ग्रामस्थांनी व शिक्षण समितीने मागणी केली होती. या आशयाचे वृत्त दै. प्रभातमध्ये प्रसिद्ध झाल्याने याची दखल घेत तात्काळ घेत काम पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील पांढरीवस्ती जिल्हा प्राथमिक शाळेतील शिक्षण समिती आणि ग्रामस्थांकडून दि. 24 ऑगस्ट 18 रोजी अर्ज करून भैरवनाथनगर बंधाऱ्यावरील संरक्षण कठडे दुरुस्तीची मागणी केली होती या मागणीला एक वर्ष होऊनही कोणत्याही प्रकारची हालचाल केली गेली नव्हती; परंतु 10 ऑगस्ट 201 रोजीच्या दै. प्रभातच्या बातमीने प्रशासन खडबडून जागे झाले आणि तात्काळ काम पूर्ण करण्यात आले आहे.
या पुलावरून लहान शाळकरी मुलांना आणि ग्रामस्थांना जीव मुठीत धरून या पुलाचा वापर करावा लागत असल्याबाबत बातमीने प्रशासन जागे होऊन काम पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.