पुणे : पुणे येथील सकल जैन समाजाच्या वतीने बिबवेवाडी येथील वर्धमान सांस्कृतिक केंद्रामध्ये “चातुर्मास महोत्सव-2019” चे आयोजन करण्यात आले असून देशभरातील जैन बांधवांनी या महोत्सवाला हजेरी लावली आहे.
यात ज्येष्ठ जैन मुनींच्या उपस्थितीत संस्कार शिबिर, स्वाध्याय शिबिर आणि बालसंस्कार शिबिर यांसह ध्यान योग साधना, प्रवचन असे कार्यक्रम होत आहेत. हा महोत्सव 12 नोव्हेंबरपर्यंत चालणार असून त्यामध्ये जैन गुरु धार्मिक, अध्यात्मिक आणि विज्ञानविषयक प्रवचनांद्वारे सामाजिक उद्बोधन करत आहेत. ध्यान गुरु आचार्य प. पू. श्री शिवमुनिजी म.सा., युवाचार्य महेन्द्रऋषीजी म. सा. तसेच आत्मयोगी श्री शिरीष मुनिजी म.सा. यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव सुरु झाला आहे.