बंगळूरू – सुप्रसिद्ध ‘कॅफे कॉफी डे’चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अचानक बेपत्ता झाले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्ही. जी. सिद्धार्थ सिद्धार्थ हे सोमवारी आपल्या कारने प्रवास करत होते. यादरम्यान, मंगळुरू येथील नेत्रावती नदीच्या परिसरात ते असल्याची माहिती मिळाली होती. मात्र त्यानंतर ते बेपत्ता झाले आहेत.
Congress leader, UT Khadar at the site of search operation for former Karnataka CM SM Krishna’s son-in-law, #VGSiddhartha, in Mangaluru: I was shocked when I got the news. Police Commissioner and DC have ordered a search operation, it is being carried out with support from locals pic.twitter.com/ZihpwcKCGN
— ANI (@ANI) July 30, 2019
याबाबत कर्नाटक पोलिसांनी नदी आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. या शोध मोहीमेत २०० जणांचा समावेश आहे. व्ही. जी. सिद्धार्थ भाजप नेते एसएम कृष्णा यांचे जावई आहेत. यातच या घटनेची मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनीही एसएम कृष्णा यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली आहे.