प्रसिद्ध ‘कॅफे कॉफी डे’चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ बेपत्ता

बंगळूरू –  सुप्रसिद्ध ‘कॅफे कॉफी डे’चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अचानक बेपत्ता झाले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्ही. जी. सिद्धार्थ सिद्धार्थ हे सोमवारी आपल्या कारने प्रवास करत होते.  यादरम्यान, मंगळुरू येथील नेत्रावती नदीच्या परिसरात ते असल्याची माहिती मिळाली होती. मात्र त्यानंतर ते बेपत्ता झाले आहेत.

याबाबत कर्नाटक पोलिसांनी नदी आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. या शोध मोहीमेत २०० जणांचा समावेश आहे. व्ही. जी. सिद्धार्थ भाजप नेते एसएम कृष्णा यांचे जावई आहेत. यातच या घटनेची मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनीही एसएम कृष्णा यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी  केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.