विश्रांतीनंतर पावसाचा जोर वाढला

पुणे – एक दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. कोकण, गोव्यासह पश्‍चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसत असून त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत असून काही धरणांमधून विसर्ग सुरू झाला आहे.

कोकणात पावसाचा जोर कायम आहे. खेड येथील जगबुडी नदीला पूर आल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला होता. खेड गावाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. पावसाचा जोर वाढत राहिल्यास खेड शहरात पाणी शिरण्याचा धोक निर्माण झाला आहे. याशिवाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा संततधार सुरू आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा, वाई आणि महाबळेश्‍वर या परिसरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सकाळपासूनच विसर्ग सुरू झाला आहे. याशिवाय दारणा आणि भावली धरणातूनही विसर्ग सुरू आहे.

पुणे शहर, जिल्ह्यातही सुरुवात
पुणे शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. रविवारी मात्र थोडी विश्रांती घेतली होती. त्यानंतर सोमवारी पहाटेपासून पुन्हा सुरवात झाली. या पावसामुळे रस्त्यांवर पाण्याची तळी साचली होती. जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर कायम असल्याने त्याभागातील नद्या दुथडी भरून वाहत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांबरोबर मुळशी, पवना, भाटघर या धरणांच्या परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)