नेहरूंनी विणलेल्या साडीचा फोटो शेअर
नवी दिल्ली – सध्या सोशल मीडियावर हॅशटॅग साडी ट्विटरचा ट्रेंड सुरू आहे. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह देशातील अनेक महिलांनी साडीतले त्यांचे फोटो शेअर केले. त्यानंतर आता मनेका गांधी यांनीदेखील त्यांचा साडीतला एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. वरुण गांधी यांच्या लग्नातला हा फोटो आहे. यात मनेका यांनी गुलाबी साडी नेसलेली आहे.
यात फोटोच्या खाली मनेका यांनी नमूद केले आहे की, मी जी साडी नेसलेली आहे ती 70 वर्षांपूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विणलेली आहे. मी ही साडी मुलाच्या लग्नात बनारस येथे नेसले होते. माझी सून यामिनी हिने नेसलेली साडी ही मला माझ्या सासूबाई (इंदिरा गांधी) यांनी लग्नात दिली होती.
काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी देखील 22 वर्षांपूर्वींचा लग्नातला फोटो शेअर केला होता.
Morning puja on the day of my wedding (22 years ago!) #SareeTwitter pic.twitter.com/EdwzGAP3Wt
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 17, 2019