प्रसिद्ध टीव्ही मालिका जमाई राजा फेम अभिनेत्री शाइनी दोशी हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानं शाइनीच्या वडीलांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. शाइनीचे वडील अमरनाथ यात्रेला निघाले होते. तिथेच त्यांचा मृत्यू झाला आहे. बराच प्रवास केल्यानंतर त्यांची तब्बेत अचानक बिघडू लागली. सुरूवातीला त्यांच्या छातीत दुखत होते पण नंतर कोणाला काही समजायच्या आतच त्यांचा मृत्यू झाला होता. वडीलांच्या मृत्यूने शाइनी आणि तिचे कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत.
एका संकेतस्थळानुसार, अमरनाथ यात्रेच्या दरम्यान तब्बेत अचानक बिघडू लागल्यानं शाइनीच्या वडीलांना मिलिटरी ऑफिसरांनी टूरिस्ट मेडिकल सेंटरमध्ये भरती केले. त्याठिकणी पोहोचल्यावर तिच्या वडीलांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दवाखान्यात नेत असतानाच त्यांचे निधन झाले होते. शाइनीच्या वडीलांचे पार्थिव आज गुजरातच्या त्यांच्या घरी आणले जाणार आहे. शाइनीला ही बातमी समजताच ती लगेचच गुजरातला रवाना झाली. तिच्या या दुःखाच्या काळात तिचे सांत्वन करण्यासाठी टीव्ही इंडस्ट्रीतील तिचा मित्रपरिवार गुजरातला पोहाचला आहे.