शिरूर – शिरूर तालुक्यातील फाकटे गावात विहीरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आहे. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर वनविभागच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने या बिबट्याला जीवदान दिले आहे.
रात्रीच्या वेळी भक्ष्य शोधतेवेळी रामदास भालेकर यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला असल्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, विहिरीतून बाहेर काढल्यानंतर बिबट्याची माणिकडोह बिबट निवारण केंद्रात रवानगी करण्यात आली. या संदर्भात माणिकडोह बिबट्या निवारण केंद्राचे अधिकारी अजय देशमुख या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे.