सातारा: येथील एमआयडीसीतील एका इंडस्ट्रीजमधील कामगार अनिकेत शिंदे (रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव) हा पत्रा गळत असल्याने आज दुपारच्या वेळेत पत्र्यावर कागद अंथरण्यासाठी पत्र्यावर चढला होता. तो पत्र्यावरून खाली पडला, त्यात तो गंभीर जखमी झाला.
त्याला उपचारासाठी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत नोंदवण्याचे काम सुरु आहे.